Ad will apear here
Next
मरावे परि अवयवरूपी उरावे...
पुणे : अपघातात ‘ब्रेनडेड’ झालेल्या एका ४० वर्षीय महिलेच्या हृदयाचे यशस्वीरीत्या प्रत्यारोपण करून मुंबईतील एका महिलेचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये अवयव काढण्याची शस्त्रक्रिया पार पडली. मृत महिलेचे यकृत आणि दोन मूत्रपिंडे तिघांना दिल्याने त्यांना जीवदान मिळाले.

पिंपरीतील एका ४० वर्षीय महिलेचा नुकताच अपघात झाला. त्या अपघातात तिच्या मेंदूला जबर मार लागला. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी ती ‘ब्रेन डेड’ झाल्याचे निदान केले. त्यानंतर तिच्या नातेवाइकांनी तिच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील एका ४२ वर्षीय महिलेला कार्डिओमायोपॅथी नावाचा आजार झाला होता. तिला हृदयाची गरज होती. पुण्यातील ब्रेनडेड महिलेच्या आणि मुंबईतील महिलेच्या रक्तगटांची तपासणी करण्यात आली. दोघींचे रक्तगट जुळल्याने मृत महिलेचे हृदय काढण्याची शस्त्रक्रिया पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून करण्यात आली. 

मग हृदय लवकरात लवकर मुंबईला पाठवणे गरजेचे होते. त्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ आला. त्यामुळे वाकडमधून पाच वाजून पाच मिनिटांनी हृदय घेऊन निघालेली रुग्णवाहिका पाच वाजून ३५ मिनिटांनी लोहगाव विमानतळावर पोहोचली. मग चार्टर्ड विमानाद्वारे हृदय मुंबईला पाठवण्यात आले. त्यानंर संबंधित महिलेवर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.

त्यानंतर मृत महिलेची मूत्रपिंडे आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने रात्री उशिरा पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यांच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 
मृत महिलेच्या नातेवाइकांनी कठीण प्रसंगीही धीराने विचार करून अवयवदानाचा निर्णय घेतल्याने तिघांना जीवदान मिळाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MYVLBA
Similar Posts
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.
रोबोटिक सर्जरीने मूत्रपिंडातील ट्यूमर काढण्यात यश पुणे : रोबोटिक सर्जरीच्या मदतीने एका ५५ वर्षीय गृहस्थांच्या मूत्रपिंडात असलेला मोठा ट्यूमर काढण्यात रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांना यश आले आहे. त्यामुळे या व्यक्तीचे मूत्रपिंड वाचवणे शक्य झाले असून, तीव्र पोटदुखीपासून त्यांची मुक्तता झाली आहे.
नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’ पुण्यातील रीबर्थ फाउंडेशन ही संस्था अवयवदानासंदर्भात जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. या संस्थेने अवयवदानासंदर्भात माहिती देणारी टोल फ्री हेल्पलाइनही सुरू केली आहे. तसेच जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेसह विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याची
१०० ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करणाऱ्या संस्था, यंत्रणांचा सत्कार पुणे : पुणे शहराने नुकताच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्त्वाचा टप्पा पार केला. यात अनेक संस्था आणि यंत्रणांचा महत्त्वाचा वाटा असून, रूबी हॉल क्लिनिकतर्फे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language